वादळ..
गरिबीच वादळ माह्या
नशीबी का तू सोडलं
पाठीवरचा हात माह्या
कामुन तू काढलं..
विद्यार्थी जीवनात
नाचलो बांगडलो
माय-बापाले मी कसं
चुरूनच खललो
बळीराजा बाप महा
रानातच राबल..
देवा तूही करणी अशी
पापाची तू देई सजा
शिकलो सवरलो
देवा तुई केली पूजा
नोकरी मिळलं असं
मनी मला वाटलं..
मागा गेलो नोकरी तर
बंडलच मागल
पैके नव्हते माह्याकडे
मन ह्यो परतलं
लागली का नोकरी
बापानं माह्या विचारलं..
पैके कुठून आणू देवा
मढयावर त्यांच्या घालाले
माह्या जागी श्रीमंतांची
पोरं त्यानं घेतली
मना येईल तेवढं रं
पैक त्याला भेटलं..
सपान माह्या बाचं कसं
बेचिराख जाहल
एवढं शिकुनी म्यार बाच्या
उरी काम घातलं
अखिर म्या बी बा-संग
रानातच राबलं...
कवी- प्रा. संतोष कदम
Post a Comment