पाऊस आला | मराठी कविता | छंद खुळा | Paus Aala

पाऊस आला..


काल पासून कोकिळा
गाणे गात होती
कानाला माझ्या
संगीत ऐकवत होती..

भल्या पहाटे मला

झोपेतून उठवत होती
कसं माहीत तिला
गण्यातच पावसाचे
जणू स्वागत करत होती..

संध्याकाळी मात्र

चमत्कारच झाला
आकाश्यामध्ये गच्च
ढगांचा मेळाच भरला..

क्षणात सुगंधित

धर्तीचा गंध पसरला
चम चम विजांचा
गडगडाट झाला..

वाजत गाजत धरणीवर

पावसाचा नाच सुरू झाला
ओलेचिंब अंग करून
घामाने खेळच केला..

गार पावसाच्या सरीने

जीवाचा थकवा दूर झाला
तहानलेल्या जीवास
पावसाने खरचं किती आधार दिला....

कवी- आनंद कदम  ( छंद खुळा )


पाऊस आला,पहिला पावसाळा , पावसाच्या धारा

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post