हे असच असत..
का असंच होत असतं,
आपलंच आहे असं का वाटतं..
कितीही जवळ असून,
दूर आहे असं का वाटत असतं..
आपलंच आहे असं का वाटतं..
कितीही जवळ असून,
दूर आहे असं का वाटत असतं..
खूप बोलावसं वाटतं असतं,
बोलायला पण जमत नसतं..
मनाला पटवून द्यायचं असतं,
कारण ते आपलं कधीच नसतं..
जवळ असते तेंव्हा काहीच वाटत नसतं,
दूर निघून गेलं की,
मनाला हुरहूर वाटत असतं..
मनाचं हे असच असतं ,
वेळीच समजून घ्यायचा असतं,
वेळ निघून गेल्यावर,
काहीच मिळत नसतं..
वेळ निघून गेल्यावर,
काहीच मिळत नसतं..
जीवनात वेळीच सावरायच असतं,
सगळं विसरून वावरायच असतं..
आनंदी क्षणांना आठवायचं असतं,
वेड्यासारखं हसत राहायचं असतं..
यापलीकडे काहीच चालत नसतं,
पहिल्यासारखा बोलायला जमत नसतं,
कारण बंधनांच कुंपण घातलेलं असतं..
एकदा बोलुन मोकळं व्हायचं असतं,
नाहीतर तसंच लटकून पडून राहत असतं..
त्रासाशिवाय काहीच उरत नसतं,
मनाला वाटेल तसं जगायचं असतं..
पश्चाताप करून काहीच होत नसतं,
जीवन हे एकदाच मिळत असतं..
हवं तसंच भेटल असतं,
जीवनात काही राहीलच नसतं..
याचंच नाव जीवन असतं,
हे सर्व असंच असतं..
हे असंच जगायचं असतं,
कारण आपल्या हातात काहीच नसतं...
कवि - आनंद कदम...
हे असचं असतं..
Post a Comment