सांग ना सखे । Sang na sakhe | मराठी कविता | छंद खुळा


सांग ना सखे..


सांगना सखे असा काय गुन्हा केला,
का तू मला असं बंदिस्त करून गेलीस..


अपल्यांशी नाते तोडून तुझा स्वीकार केला,
का तू असं माझं नात तोडून गेलीस....

जगाशी लढून मी तुझ्या प्रेमाचा विजय केला,
का तू माझा असा पराभव केलीस..


आपले दुःख विसरून तुझ्या सुखाचाच विचार केला,
का तू माझ्या सुखाला दूर घेऊन गेलीस....

माय-बापाना विसरून तुझाच विचार केला,
का तू असा माझा विश्वासघात केलीस....


सर्वांशी करतो अभिमानाने तुझाच बोलबाला,
का तू असा माझा अभिमान तोडलास....

तुझ्यामुळेच सप्तरंगीत स्वप्नांचा विचार केला,
का तू असा माझा स्वपभंग केलास...


कोणत्याही कमतरतेचा आभास नाही होऊ दिला,
का तू असा माझा तिरस्कार केलास....

सातजन्म तुझ्याच संगे जगण्याचा वादा दिला,
का तू अशी वादाखिलाफी केलीस....


दुःखाचा डोंगर जीवनात कधी नाही येऊ दिला,
का तू मला दुःखात ढकलुन दिलीस....

जीवनात वेदनांचा कधी स्पर्श नाही होऊ दिला,
का तू मला इतक्या वेदना देऊन गेलीस....


जगतांना प्रत्येक क्षणाला तुला साथ दिली,
का तू माझी अशी साथ सोडून दिलीस....

                                      कवि - आनंद कदम

मला सोडून का जातेस,जग सोडले तुझ्याशी प्रेम केले

व्हिडीओ मध्ये पाहण्यासाठी खलील लिंक वर जा..
                             सांग ना सखे..

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post