प्रायव्हेट लिमिटेड| मराठी कविता | छंद खुळा | Private Limited

प्रायवेट लिमिटेड


वाईट प्रसंगावर मात करून शिक्षण पूर्ण केले,
अमाप पैसे खर्च करूनही नशिबी बेरोजगारी आली..


शिक्षणासाठी आई-वडिलांनीे जीवन अर्पण केले,
मनासारखा जॉब शोधण्यात जीवन व्यर्थ गेले..

सरकारी नौकरी शोधता-शोधता खूप फसगत झाली,
सुखी जीवन जगण्यासाठी पैश्याची गरज भासली..


शेवटी कशीतरी प्रायव्हेट कंपनी मध्ये निवड झाली,
कदाचित नशिबानेच माझी मैत्री प्रा. कंपनीशी केली..

कंपनीत काम करत असंख्य संकटावर मात केली,
खूप मेहनत करूनही शेवटी निराश्याच हाती आली..


संसाराची गाडी रुळावरून खाली घसरत गेली,
दैनंदिन खर्चाने आनंदित जगण्याची स्वप्ने भंग झाली..

अचानक काल आमच्या बॉस ने मिटिंग बोलवून घेतली,
बऱ्याच काही गोष्टी आमचे बॉस बोलून गेले..


कडू-गोड शब्दांनी आमची जणू झाडीच झाली,
अस्तित्वाची आमच्या खरी जाणीव करून गेले..

बोलण्याने त्यांच्या अदृश्य शक्तीच जागी झाली,
चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करून गेले..


मिळून मिसळून काम करत आनंदाची सुरुवात झाली,
प्रत्येक समस्या दूर करत कंपनीला चांगले दिवस आले..

प्रत्येक काम सोपे आणि  कामात नवचैतन्य वाढत गेले,
प्रायव्हेट कंपनीत काम करण्याचे स्वतंत्र मिळाले..


जे पाहिजे ते जीवनात सहज मिळवने शक्य झाले,
निराशाजनक आणि दुःखी जीवनाचे खरे चीज झाले..

                             कवि - आनंद कदम...


0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post