दिलाचे हजार तुकडे | मराठी कविता | छंद खुळा | Dila che Hajar Tukde

दिलाचे हजार तुकडे..


प्रियेच्या प्रेमाने वेडे झालेे खोपडे
म्हणलो मी तिला चल बागेकडे

वाटलं प्रियेला शिखवुया प्रेमाचे धडे
तिच्यासाठी टाकले होते फुलांचे सडे

दोघेही झालो होतो प्रेमामध्ये वेडे
मांडीवर डोकं, नजर तिच्याकडे

सगळ्यांची नजर आमच्याच कडे
डोक्यात आमच्या प्रेमाचीच किडे

कधीच वाटलं नाही, अशी वेळ येईल गडे
कशी नजर गेली भावाची आमच्याकडे

पळत होतो येड्यासारखं इकडे-तिकडे
भावाने झोडपले करून मला नागडे

माझ्या अंगावर रहीले नाही कपडे
माराणे त्याच्या झाले शरीर वाकडे

त्यात अंग होते पहिलेच सुकडे
बस झाले आता प्रेमाचे लफडे

आठवले तेंव्हा बापूचे तीन माकडे
दिलाचे होऊन गेले हजारो तुकडे

                  कवी - आनंद कदम..

दिलाचे हजार तुकडे, प्रेम,प्रेमी जोडी,प्रेमाची फसगत.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर जा..
                   दिलाचे हजार तुकडे..👌👌

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post