माय माझी...
माय माझी झाली वयाने आता ऐंशीच्या वर
अजून पदर नेहमी असतो, तिच्या डोक्यावर..
अजून पदर नेहमी असतो, तिच्या डोक्यावर..
गोड हास्य असते नेहमी, तिच्या गालांवर
मायेच सर्व विश्व समावलं तिच्या मांडीवर..
लाजने तिचे, आताही भारी पडेल! नव्या नवरीवर
प्रत्येक जण फिदा तिच्या हातच्या खमंग चवीवर..
प्रत्येक जण फिदा तिच्या हातच्या खमंग चवीवर..
दिवसभर सारखी असते, नुसतं काम करण्यावर
येत नसेल का थकवा सारखं काम करून दिवसभर..
हिरवी चोळी न साडी कशी शोभून दिसते अंगावर
सूर्याप्रमाणे कुंकु लावत असते आपल्या कपाळभर..
सूर्याप्रमाणे कुंकु लावत असते आपल्या कपाळभर..
मुखात दात नसून सुपारी चघळत असते दिवसभर
माय माझी भोळी-भाबडी पण जीव तिचा सगळ्यांवर..
चालत असते कशीबशी काठीच्याच आधारावर
सुरकुत्या गालावर, किती शोभतो चष्मा चेहऱ्यावर..
सुरकुत्या गालावर, किती शोभतो चष्मा चेहऱ्यावर..
माझ्या मायेचं प्रेम श्रेष्ठ जगातील सर्व नात्यावर
कोणी दिले असतील! हे संस्कार तिला या धर्तीवर..
कितीही त्रास असला तरी, घेते नेहमी हसण्यावर
का हसत असते? दगड ठेऊन आपल्या हृदयावर..
का हसत असते? दगड ठेऊन आपल्या हृदयावर..
आम्हा पोटभर आणि आपण झोपते उपाशी पोटावर
पण तिला काय माहीत, माझी नजर असते तिच्यावर..
थोडं काही झालं की लगेच अश्रू होतात अनावर
अथांग प्रेम करत असते, ती आपल्या लेकरावर..
अथांग प्रेम करत असते, ती आपल्या लेकरावर..
काही केले तरी अंत नाही लागणार तिचा जन्मभर
मनोभावे सेवा करील तोच राज्य करेल स्वर्गावर..
कवी - आनंद कदम..
माय माझी..
Very Nice... Great.. BALAJI KAPSE
ReplyDeleteThank you so much....
ReplyDeleteThank you...
ReplyDeletePost a Comment