गरिबांची लेकरं..
का माझ्या नशिबी, येवढी गरिबी आली
जीवनातील आनंदास, दूर घेऊन गेली..
जीवनातील आनंदास, दूर घेऊन गेली..
बिमारीच्या खर्चान, रात्रीची झोपच उडाली
दिवस-रात्र मेहनत करून, नेहमी खिसा खाली..
चतकोर भाकरीवर, उपाशीपोटी रात्र गेली
शेत नाही घर नाही फुटके पत्र पण उडत गेली..
शेत नाही घर नाही फुटके पत्र पण उडत गेली..
जीवनात सर्व दुःख का माझ्याच नशिबी आली
गरिबीमुळे निरक्षर राहिलो, म्हणून ही वेळ आली..
सुखी कुटुंबाला कुणाची वाईट नजर लागली
बालपणीच लेकरं माझे! का असे भिकेला लागली..
बालपणीच लेकरं माझे! का असे भिकेला लागली..
चप्पल नाही पायात उन्हाचे चटके खाऊ लागली
कापड्या विना लेकरं माझी नागडी फिरू लागली..
देवापुढे मी माझ्या खूप मनातून विनंती केली,
पण वाटते देवाणेही माझ्याकडे पाठ फिरवली..
पण वाटते देवाणेही माझ्याकडे पाठ फिरवली..
भावी आयुष्याचे खूप स्वप्ने होती रंगवली
अचानक जीवनामध्ये गरिबीची आग लागली..
गरिबी मध्ये जन्माला यायलाच नको होते
पण नशिबानं ठेवलं तसं राहावच लागते..
पण नशिबानं ठेवलं तसं राहावच लागते..
नियतीपुढे कुणाचं कधी काय चाले
गरिबीपेक्षा किड्या-मुंग्यांचे जीवन भले..
सुखी जीवनाची फुले कोमेजून जाऊ लागली
आपल्याच माणसांनी साथ सोडून दिली..
आपल्याच माणसांनी साथ सोडून दिली..
डोळयांसमोर माझ्या जीवनाची वाट लागली
मरणाची वाट शेवटी आपली करून घेतली..
Post a Comment