परकं प्रेम | मराठी कविता | छंद खुळा | Park Prem

परक प्रेम..

आपलंच प्रेम कधी-कधी परकं का वाटतं
मनाला अस अधून-मधून का भासत राहतं..

पुढे काय होईल यातच मन खचून जातं
प्रेमामध्ये पास होणं फार काढीन असतं..

सगळ्यांनाच प्रेम का सारखं होत नसतं
दुसऱ्यांच्या तुलनेत थोडं जास्तच वाटतं..

प्रेम करत असतांना मागे पाहायचं नसतं
बेधुंद पने कुणावर तरी मरायचं असतं..

स्वप्नांना रंगी-बेरंगी रंगानी रंगवायच असतं
दुराव्या ला कधी जवळ येऊ द्यायचं नसतं..

जीवनात एकदा नशीब अजमावायच असतं
जीवनाला असच मुक्त जगून पाहायचं असतं..

प्रेमामध्ये कुणावर तरी जगून मारायचं असतं
लपून-छपून एकमेकांना बागेत भेटायचं असतं..

फुलांच्या कळ्याना प्रेमाने फुलवायच असतं
प्रेयेच्या केसांमध्ये फुलांना सजवायच असतं..

मन दुखणार नाही याचंही भान ठेवायचं असतं
प्रेम रुसल तर त्याला प्रेमानं मनवायच असतं..

सुंदर आठवणींनी जीवनाला भरवायच असतं
एकाच ताटात दोघांनी मिळून खायचं असतं..

एकाने चुकी केली तर दुसऱ्यांनी माफ करायचं
न काही बोलताच सगळं समजून असते घ्यायचं ..

रुसणं, फुगणं आणि रागावणं हे असचं चालायचं
दुःखामध्ये ही जीवनाला आनंदीत जगत राहायचं..

                                  कवी - आनंद कदम..



व्हिडीओ मध्ये पाहण्यासाठी खाली क्लिक करा..

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post