माझी बायको महान..
आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, एक कविता "माझी बायको महान " . ज्यांचे लग्न झाले असेल त्यांना आपल्या बायको बद्दल काय वाटते? ते मी या कवितेत लिहण्याचा प्रयत्न केला आहे. कारण प्रत्येकालाच आपल्या पत्नीच्या सर्व गोष्टी आवडतात असे नाही, काही जनांना कितीही बायकोने चांगले वागले तरी त्यांना त्याची काही जाणीव नसते, आणि तिची काहीच काळजी पण नसते. परंतु ज्याचे त्याचे विचार वेगळे असतात. पण मला जे सुचलं ते मी या कवितेतून माझ मत स्पष्ट केल आहे. तर एकदा वेळ काढून खालील वीडीओ पहाच....
माझी बायको आहे खरचं खूप महान
दररोज करत असते आपल्या जीवनाच रान..
सुखी संसारातच तीचे असते सर्व समाधान
कितीही असले काम तरी असते सगळ्यावर ध्यान..
नवऱ्यासाठी काय काय करू हेच तिचे ध्येय
त्यात सासू- सासऱ्यांची ही करते खूप सोय..
कधीही आयुष्यामध्ये होऊ देत नाही गैरसोय
तिही एक दिवस होत असते लेकराची माय..
बायकोच देत असते एका घराला घरपण
कधीच होऊ देत नाही आनंदाची घसरण..
सुखी संसाराच्या इच्छेने होते तिचेच मरण
तरी पण नेहमी करत असतो तिचेच गऱ्हाणं..
एक दिवस ती नसली की घर होते विराण
जगावे असे नाही वाटत एकटेपणाचे जीवन..
प्रत्येक गोष्टीवरून येते तिची खूप आठवण
फक्त तिला हवी असते प्रेमाची वागवन..
जगात आहे तिला दुसरं स्थान
करत राहू नका तिचे गाऱ्हाणं..
सांभाळून घ्या तिला प्रेमानं
तीच तर असते विवाहितांची शान..
कवी - आनंद कदम
एकदा जरूर पहा हा युट्युब विडिओ आणि शेअर करा...
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा..
My wife's great ..
I have brought for you today, a poem "My wife is great". What do married people think about their wives? That is what I have tried to write in this poem. Because not everyone likes everything about his wife, some people are not aware of how good his wife is, and he doesn't care about her at all. But his thoughts are different. But I have made my point clear in this poem. So take a moment and watch the video below ....
My wife is really great,
she does every day of her life ..
In a happy world,
she has all the satisfaction,
no matter how much work she does,
she meditates on everything ..
Her goal is what to do for her husband.
No inconvenience,
it happens one day,
the mother of the child ..
The wife gives it to a house,
it never becomes a home,
the loss of happiness ..
It happens because of the desire of a happy world,
even though she dies,
but she always suffers from it ..
I don't think life is lonely ..
She comes from everything,
she misses her very much,
she just wants to be treated with love .. She is in the world,
don't keep her second place,
take care of her ..
Author - Anand Kadam
Post a Comment