देखणी पोरगी..
मित्र आज माझा पोरगी पाहायला निघाला
केस काळे अन थोबाड फेशल करून घेतला
केसांची विचित्र स्टाइल करून हवेत उडत
इन मिन करून कसा झकास दिसू लागला।
दिसभर तंबाखू आणि खरा खाऊन
मळकट दात पतंजली ने घासून आला
वेगवेगळ्या अत्तराचा वास पसरऊ लागला
क्रीम,पावडर ने चेहरा जाम चमकू लागला।
खूप शिक्षण शिकून नुसते कागदे जमा केली
भारा बांधून घरामध्ये वर टांगून ठेवली
हाताला नाही कामाचा पत्ता पण
मोबाईल वरच दिवस रात्र डोळे मातीत घातली।
वन-वन फिरून झालेल्या काळ्या पायाला
झाकण्यासाठी प्रयत्न करत राहिला
शेवटी कसाबसा इकडून तिकडून
पायमोजे आणि बुटाची सोय केला।
टका-टक होऊन मुलीच्या घरी पोहोचला
पाय साबणाने धुवून टॉवेल चा पूर्ण वापर केला
सगळ्या समोर पलंगावर मांडी घालून बसला
टक-मक मधल्या दरवाजात पाहतच राहिला।
तेवढ्यात पायांच्या चैनीचा आवाज ऐकू आला
मित्र माझा उठून ताडकन, समोर येऊन बसला
कारण यापूर्वी बऱ्याच वेळेस चान्स होता हुकला
डुलत-डुलत मुलगी चहा घेऊन आली।
लगेच याच्या मनात स्वप्नांची मैफिल रंगली
स्वप्नात रंगताना चहाने चड्डीच छान रंगली
मुलगी पाहण्याच्या नादात नको ते फसगत झाली
चहा च्या नादात का होईना पोरगी नजरेत भरली।
तिच्याकडे पाहत चहा संपल्यावरही सुरके घेत होता
मनातल्या मनात खुदु खुदु हसत होता
मनासारखी मुलगी भेटली म्हणून जाम खुश झाला
सगळ्यांच बोलणं झाल्यावर त्याला प्रश्न केला।
गड्याने लगेच एका नजरेत तिला हो म्हणून टाकला
कारण पुढच्या जीवनाचा प्रश्न होता पडला
दुनियेच्या पोरी पाहून जीव होता थकून गेला
मित्र आज माझा खरचं जणू सायब दिसू लागला।
कवि- आनंद कदम
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर जा
देखणी पोरगी..
Post a Comment