2019 निवडणूक...
आली आली.. निवडणूक आली
2019 ची निवडणूक आली..
नेत्याची पोपटांगत बडबड सुरू झाली
आजी माजी नेत्याची सभा सुरु झाली
हॉटेल आन बार सगळेच बुक केली
काळ्या पैस्याने सगळे नेते विक्री केली
जणू फुकट्या लोकांची जत्राच भरून गेली
मोदी आले, योगी आले, बीजेपी ला सुगीचे दिवस सुरू झाले
काँग्रेसने सत्ता गमावून परेशान झाले
केजरीवाल, ममता नितीश कुमार आले,
आपल्याच राज्यात पाय रोवून बसले
मायावती, अखिलेश सत्तेतून दूर झाले
शेवटी हातात हात देऊन मोकळे झाले
कसमे वादे खूप करून गेले पण
शेतकऱ्याचे स्वप्न अधुरे राहिले
बेरोजगारी भूकमरी ने परेशान केले
चला कुणाचे तरी अच्छे दिन आले
अच्छे दिन आले..
अजून एका निवडणूक चे बिगुल वाजले
सगळे कार्यकर्ते कसे कामाला लागले
पैसे आणि दारूने शहर गजबजून गेले
पिंट्याचा बाबा ने लाऊड स्पीकर लावले
नाचून नाचून गल्लीतील कुत्रे गोळा केले
गावचे वातावरण कसे बेधुंद होऊन गेले
जो येतो छाती फुगवून बोलतो
कामाच्या वेळेस पाठ फिरवून बसतो
राजनीती मध्ये कुणाचे भले झाले
आप-आपले खिसे मात्र भरून घेतले
डोळे उघडे ठेऊन विचार केलेला बरे
राजकारणी लोकांचे काहीच नसते खरे...
कवी - आनंद कदम
Post a Comment