माझे राजे | राजे | Maze Raje
साऱ्या दुनियेत नाव हे गाजे,
राजे! शिव छत्रपती शिवाजी राजे..
माझा शिवबाची कीर्ती महान,
करतो शिवबाला शत-शत नमन..
कसा किल्यावर फडके हा भगवा
माझ्या राजाचा लई भारी रुतबा..
सकल मराठ्यांची आहे हो शान,
शिवबा मुळेच दावले हे प्राण..
ज्याची जिजाऊ सारखी माता
म्हणून रयतेचा झाला तो दाता..
नव्हती कुठलीही जात-पात कुणाची
घेऊनी सर्वाना केली स्थापना स्वाराज्याची..
धन्य धन्य ती जिजाऊ माता, जिच्या पोटी शूर हा जन्मला,
प्रत्येक गडावर केला ताबा, कसा विजयी पताका फडकविला..
कधीच असा राजा होणे नव्हे दुसरा
पर स्त्रीला देतो बहिणीसारखा आसरा..
माझ्या राज्याचे राजकारणच न्यारे
जिथे राहायचे गुण्यागोविंदाने सारे..
मुसलमान बंधू साठी बांधून दिली दर्गा
कुठे दिसतो का असा धर्म प्रिय सर्जा..
गनिमी कावा माझ्या राजाचा लईच न्यारा
शत्रू ला हरवूनच करतो प्रत्येक सण साजरा..
अफझल खानाने कट होता रचला
वाघ नखाने त्याला उभा-उभी चिरला..
प्रत्येक मावळा शिवबासारखा पाहिजे,
स्वराज्यासाठी लढता लढत प्राण दिला पाहिजे..
किती लिहू शिवबाची गाथा लिहता लिहता
कागदाची झाली ढाल अन कलमाची तलवार ..
हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी..
कवी - आनंद कदम
शिव छत्रपती शिवाजी महाराज |
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
माझे राजे...
Post a Comment