अधुरे स्वप्न...
काल रात्री मी एक स्वप्न पाहीलेमनात माझ्या प्रेयचे चित्र उमटले
डोळे माझे लागेच चकमक झाले
प्रियेला पाहून मन कसं बहरून गेले
हृदयाचे ठोके धड-धड करू लागले
प्रीतीच्या सहवासात मन हरवून गेले
स्पर्श तिचा होताच अंग शहारून आले
अंग तिचे जणू काही मखमलीने झाकले
कुरळे केस जणू वाऱ्यासोबत खेळत होते
माझे मन फक्त तिलाच न्याहाळीत होते
पायातील घुंगरू जणू संगीत ऐकवीत होते
माझे मन फक्त तिला सूर देत होते
मी म्हणालो प्रियेला जरा जवळ घे
ती म्हणाली मला, जरा डोकं मांडीवर घे
अस बराच वेळ चालतच राहीलं
प्रेमाचे दोन शब्द बोलून मन हलकं केलं
अचानक स्वप्न अंधारातून उजेडात आलं
कारण,
उशीर झाला म्हणून, आईनं होत झोडपलं
स्वप्नाचा माझ्या जणू फुगा! फुगूनच फुटला
स्वप्नात का होईना तिचा स्पर्श होऊन गेला
हृदयाचे ठोके बंद होता होता राहिले
घामाने अंग ओलेचिंब होऊन गेले
स्वप्नाचे माझ्या बारा वाजून गेले
खरचं स्वप्नात माझ्या! प्रेम होऊन गेले
कवी - आनंद कदम
अधुरे स्वप्न |
Post a Comment