भांडवलशाही धोक्यात| Bhandwalshahi Dhokyat| छंद खुळा

भांडवलशाही धोक्यात| Bhandwalshahi Dhokyat| छंद खुळा



Bhandwalshahi Dhokyat
भांडवलशाही


भांडवलशाही एक समस्या. आर्थिक आणि राजकीय भांडवलशाही धोक्यात..


समाजातील परिस्थिती पाहता आपल्याला असे लक्ष्यात येईल की, खरचं आज भांडवलशाहीला किती धोका निर्माण झाला आहे. 2008 च्या आर्थिक मंदीपासून आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेकडून कुठलीही आर्थिक मदत मिळत नाही आहे असे आपल्या समोर दिसून येईल. आज देशाची आर्थिक परिस्थिती फार खालावत चालली आहे. देशाचा युवा आणि रोजगार वर्ग अतिशय परेशान आणि कष्टा मध्ये सापडलेला आहे. नौकरी, व्यवसाय आणि शेती ह्या वर्गामध्ये खूप खळबळ उडाली आहे, कारण नौकरी नाही व्यवसाय चालत नाही आणि शेतीत पण उत्पन्न निघत नाही, उत्पन्नपासून मिळणाऱ्या पैस्यापेक्षा लागवड खर्च जास्त होत आहे. किती ही शिकून पदव्या घेऊन काहीच उपयोग होत नाही आहे. आर्थिक आणि राजकीय मदत कुठल्याही प्रकारे मिळत नाही आहे. म्हणून असे आपल्याला म्हणावे लागेल की भांडवलशाही आज भयानक धोक्यात जाऊन पोहचलेली आहे. वर्तमानपत्र वाचले असेल तर आपल्याला एक बतमी दिसून आली असेल की, आपल्या देशाच्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी असे स्पष्ट केले आहे की,


 " 2008 नंतरच्या वैश्विक आर्थिक मंदीनंतर आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेकडून कुठलीही समान आर्थिक मदत पुरवण्यात आलेली नाही आहे."  - रघुराम राजन (माजी गव्हर्नर)

ही पूर्ण माहिती आपल्याला समजून घेण्यासाठी  सरासरी आकडे पाहावे लागतील, नंतरचं आपल्या लक्षात येईल की आज देशाची काय परिस्थिती आहे ते आणि यावर काय पर्याय घेण्यात यावा. 
आज आपण पाहतच आहोत की, व्यवसायाची काय परिस्थिती आहे. व्यावसायिकांना आपले भाडे आणि दररोज चा खर्च काढणे किती अवघड होऊन बसले आहे. दिवसेन दिवस किती स्पर्धा वाढत आहेत हे आपल्या लक्षात येईलच. अश्याच प्रकारे नौकारीचे पण हाल आहेत, पाहिजे तश्या नौकऱ्या उपलब्ध होत नाही आहेत. या सर्व बाबींना आपल्या देशाची आर्थिक आणि राजकीय व्यवस्था कारणीभूत आहे हे आपल्या लक्षात निश्चित येईल. गरज आहे ते आपल्याला जागे होऊन यावर विचार करण्याची. 
हल्लीच्या काळात आकड्यांची आकडेमोड खूपच वाढत चालली आहे. खऱ्या अकड्यांना लपवून खोटे आकडे समोर ठेवण्यात येत आहेत. काय खरे आणि काय खोटे हे समजणे फार अवघड झाले आहे. जो पर्यंत देशाचा आर्थिक दर सुधारत नाही तोपर्यंत काही बोलणे अवघडच आहे. देशाला इतर देशाच्या तुलनेत जर वरचढ व्हायचं असेल तर आर्थिक दर सुधारून युवांना नौकरी आणि व्यवसायाला चालना मिळेल असे पाऊले उचलण्याची गरज आहे, तरचं आपला देश एक बलाढ्य देशाच्या यादी मध्ये येईल.
आज आपण पाहतच  आहोत की एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे भांडवल आणि पैसा हा लागतोच आणि असेही नाही की सगळ्याकडे पैसे असतातच. अश्या वेळेस आपल्याला गरज भासते ते म्हणजे कर्जाची! आता कर्ज काढायचं म्हणजे बँके शिवाय पर्याय काय, काहीच नाही. परंतु बँक ने पण हात वर केले तर आपण जायचं कुठे? कुठून पैसा आणायचा? म्हणून यासाठी गरज आहे ते सरकारच्या  नवीन धोरणांची, जेणेकरून लघु आणि मध्यम व्यावसायिक आपले व्यवसाय सहजरित्या सुरू करू शकतील. आपण ऐकले असेल सरकारकडून बऱ्याच योजनांची यादी दाखवली आहे जसे मुद्रा लोण, लघु व मध्यम व्यवसाय लोण अजून बरचं काही पण याचा किती लोकांना फायदा झाला किती लोक वर आलीत या योजनेत? निश्चित उत्तर काहीच नाही देता येणार कारण याचा लाभ पाहिजे तसा कुणाला मिळलेलाच नाही. आज नुसत्या योजना काढून काय फायदा त्याची अंमलबजावणी आणि व्यवस्थित जर पाहणी करून लाभार्थ्यांना लाभ मिळेल असे पावलं उचलायला हवीत. त्याच बरोबर आपल्याला विचार करायला हवा की कितपत यांचा फायदा होत आहे आणि खरे काय आहे.
बऱ्याच संस्था आहेत जे वारंवार आकडे आपल्यासमोर आणत असतात आणि सरकारच्या पण काही साईट वर आपल्याला संपूर्ण माहिती आणि आकडे पाहायला मिळतील. आज काल सगळे खूप हुशार झाले आहेत गूगल वर पाहिजे ते माहिती मिळवू शकतात.

Capitalism is a problem. Economic and political capitalism in danger.



Looking at the situation in the society, we can see how much danger is posed to capitalism today. You will see that the economic and political system has not received any financial support since the 2008 recession. Today, the country's economic situation is deteriorating. The youth and working class of the country are in a very troubled and distressed state. There is a lot of excitement in jobs, business and agriculture, because there is no job, no business, and in agriculture there is no income, the cost of cultivation is higher than the income. There is no point in taking degrees after learning so much. There is no financial or political help. So we have to say that capitalism is in grave danger today. If you have read the newspaper, you may have noticed that Raghuram Rajan, the former Governor of the Reserve Bank of India, has made it clear that,


"No equal financial assistance has been provided by the economic and political system since the global economic downturn after 2008." - Raghuram Rajan (Former Governor)


To understand this complete information, you have to look at the average numbers, then you will realize what the situation is in the country today and what options should be taken on it.
Today we see what the business situation is like. How difficult it is for professionals to calculate their rent and daily expenses. You will notice how many competitions are increasing day by day. In the same way, there are jobs, but there are not enough jobs available. You will realize that all these factors are due to the economic and political system of our country. All you need to do is wake up and think about it.
The number of figures has been increasing a lot in recent times. False numbers are being put in front by hiding the real numbers. It has become very difficult to understand what is true and what is false. It is difficult to say anything unless the country's economic growth rate improves. If the country wants to be ahead of the rest of the world, it needs to take steps to boost jobs and businesses for the youth by improving economic rates, then our country will be on the list of a strong country.
Today we see that starting a business requires capital and money and not everyone has money. What you need at such a time is a loan! Now taking out a loan is an option without a bank, nothing. But where would we go if the bank raised its hand? Where to get money? This requires new government policies so that small and medium enterprises can start their businesses easily. You may have heard that the government has shown a list of many schemes like Mudra Lon, Small and Medium Business Lon, but how many people have benefited from this scheme? No definite answer can be given because no one has got the desired benefit. Today, we need to take steps to ensure that the beneficiaries benefit from a simple plan, its implementation and if properly inspected. At the same time, we need to think about how much they are benefiting and what the truth is.
There are many organizations that bring you statistics frequently and on some government sites you will find complete information and statistics. Today, everyone has become so smart that they can get the information they want on Google.


0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post