सैराट आर्ची- कॉमेडी मराठी कविता | Sairat Aarchi | Marathi Kavita | Chhand Khula


सैराट आर्ची..


म्यां म्हनल गण्याले
चल वाड्यावर जाऊ
पाटलाच्या आर्चिला
डोळे भरून पाहू..

गण्या आमचा पहिलाच
खूपच बडबड्या
बोलता-बोलता काढतो
नुसत्या बुडबुड्या..

गण्याच्या फाटक्या चड्डीला
कधीच नसतो नाडा
दिवसभर पान खाऊन-खाऊन
तोंडाचा झाला पाणपुडा..

कसा-बसा गण्याला म्या
लगेच तयार केला
वाड्यावर जाण्याचा
बेत पक्का केला..

कोण आहे वाड्यावर समदा
पत्ता काढून घेतला
गण्याने फाटक्या चड्डीला
करदोडा बांधून घेतला..

हळू-हळू वाड्याच्या दिशेने
पाय चालते केले
कोणीच नसेल वाड्यात
खात्रीने पक्के केले..

पायऱ्या चढून दारावर
जाऊन पोहचलो
कोणी येईल या भीतीने
दोघेही होतो खचलो..

चोरागत म्या खिडकीचे दार
थोडे ढकलली
खिडकीत पाहताच गण्याला
चक्कर येऊ लागली..

सुंदर, नाजूक अर्चिला पाहून
डोळे दिपूनच गेले
तिचे देखने रूप पाहून हृदय
धड-धड करू लागले..

तिच्याकडे पाहता पाहता गण्या
धाडकन खाली पडला
आवाजाने त्याच्या पाटील
पळतच खाली आला..

शेम्बड्या गण्याने आमच्या मार
कुत्र्यागत खाल्ला
वाड्यावरच्या अर्चिच्या नादात 
बेत महागात पडला..

              कवी - आनंद कदम


0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post