प्रिये तुझा भास...
तू आलीस मनाला खूप बरं वाटलं
माझ्या शरीरातल रक्त घोटायचं वाचलं
तु कधी येशील याचंच कोड पडलं होतं
खूप काही बोलायचं राहूनच गेलं होतं..
तुझ्या येण्याने स्वप्ने अजून छान रंगून गेली
काळोखाची रात्र कायमची दूर निघून गेली
आकाशात चांदण्याकडे सारखा पाहत होतो
गोड आठवणी प्रियेच्या ताज्या करत होतो..
नाभतील चांदण्यांना पटवून हेच सांगत होतो
तुझ्यापेक्षा सुंदर दिसते हेच दाखवून देत होतो
परिसाच्या स्पर्शाने लोह्याचे सोने होऊन जाते
प्रियेच्या स्पर्शाने जीवन आनंदमय होऊन जाते..
जुन्या आठवणीत तुझ्या जीव गुंतून जात होता
आयुष्यातील एक-एक दिवस मागे जात होता
अथांग सागरात जीव तुझाच शोध घेत होतो
पोहणे येत नसतांना सुद्धा उड्या मारत होतो..
तू वाऱ्यासारखी अली अन निघून गेली होतीस
ह्रदयात जागा कायमची करून गेली होतीस
माझा मी न राहिलो, तुझ्या प्रेमात मग्न झालो
सात जन्मांतरीचे तुझ्यासंगे वादे करून गेलो..
नको जाऊस सोडूनी मजला यापुढे कधी
पडू नाही देणार कमी शिदोरी प्रेमाची कधी
तू ओळखूनी कधी घेशील जीवास माझ्या
कधी बनशील हिर प्रेमरुपी जीवनाची माझ्या..
नाही बांधू शकलो ताजमहाल, तरी काय झाले?
हृदयात माझ्या तुझ्यासाठीच मंदिर उभारले
तुझ्याविना एकट्यानेच वाईट दिवस काढले
तुझ्याप्रती माझे प्रेम, कधी कमी पडले?..
कवी - आनंद कदम
Post a Comment