Surgical Strike | सर्जिकल स्ट्राईक | Marathi Kavita | Channd Khula

सर्जिकल स्ट्राईक




देशात वाढलाय आतंकीचा माज

कश्मीर मध्ये चालतोय नंगा नाच

दहशत पसरवून आखतात पेच
निर्दोष लोकांना मारणे उद्देश हाच..

पाकिस्तान हेच त्यांचे मूळ स्थान

जगाला करुन सोडले नुसते परेशान

जिथे गेले तिथले झाले स्मशान
दहशतवादाचा खात्मा, हाच आखरी प्लॅन..

सैनिकांना मारून समजतात स्वतःला बलवान

चाळीस गेले तर, तयार होतील दहा पट जवान

भारत मातेच्या रक्षणासाठी लाखो प्राण हजर
महागात पडेल! टाकू नका आमच्यावर नजर..

आमचे जवान आमच्या देशाची खरी शान

देशासाठी कधीही तयार देण्यास बलिदान

नका लागू नादाला आमच्या, करू नका घाण
घरात घुसल्यावर मिळणार नाही पाळायला रान..

कमजोर यादीतला नाही आमचा देश

आखला बेत तर, होऊन जाईल सर्व नाश

सगळीकडे पडतील फक्त लाशच-लाश
शेवटी निश्चित आहे दहशतवादयांचा विनाश..

हल्ले करण्यास बसले होते आतंकवादी तयार

सर्जिकल स्ट्राईक पडली त्यांना आता महागात

पाकिस्तानात घुसून केला वायूसेनेने वार
आतंकवादयांना उडवून जवान परतले देशात..

भारत देश आमच्यासाठी जीव की प्राण

इथे राहतात बंधू-प्रेमाने, सर्व धर्म समान

नका पसरवू दहशतवाद, नका घेऊ प्राण
जगात सगळीकडे नांदो सुख शांती समाधान..
                          
                                कवी - आनंद कदम
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा..
               सर्जिकल स्ट्राईक



0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post