रॅप आले...
मधुर स्वरांचे गीत हरवले,
नवीन सदीचे गाणे हे आले,
ताल-सुर जणू भांडु लागले
स्वरांचे जणू भान विसरले ।।1।।
गाण्याचे कसे आज रॅप झाले, रॅप झाले...
हात वाकडे, तोंड वाकडे
यो यो करत बोंबलू लागले
गाण्याचे झाले नवीनच लफडे
गीतकार झाले लोक शेम्बडे || 2 ||
गाण्याचे कसे आज रॅप झाले, रॅप झाले...
काही कसही बडबडून लागले
गाण्याची नुसती वाट लावले
सगळेच कसे पळत सुटले
जणू काही मागे कुत्रे लागले || 3 ||
गाण्याचे कसे आज रॅप झाले, रॅप झाले...
गाणे आले अन लगेच विसरून गेले
गाण्यात यांच्या कुणाचे मन रमले
कुणाच्या हृदयात घर करू शकले!
श्रेया ,लताना असे कशे विसरले || 4 ||
गाण्याचे कसे आज रॅप झाले, रॅप झाले...
गाण कसं मधुर असल पाहिजे लगेच
काळजाला जाऊन लागले पाहिजे
अंगावर काटा असेच भासाले पाहिजे
सगळीकडे आज का हेच गाणे गाजे || 5 ||
गाण्याचे कसे आज रॅप झाले, रॅप झाले...
मनामध्ये गाणं गुणगुणत राहावं
अर्थहीन शब्दाचं गाणं नसावं
प्रेत्येक ओठावर चिटकून बसावं
आजारी माणसाने लगेच उठून बसावं || 6 ||
गाण्याचे कसे आज रॅप झाले,रॅप झाले...
कवी - आनंद कदम
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा..
रॅप आले..
Post a Comment