दहशतवादी..
जो जन्मताच संस्कारहीनदेशद्रोही, धर्मविरोधी
कपटी, कुटील अपराधी
तोच आहे खरा दहशतवादी...
ज्यांना ना माता-पिता
ना बंधू-भगिनी, आप्त
स्वकीय , ईस्ट मित्र
तोच आहे खरा दहशतवादी...
जो सुशिक्षित असून अडाणी
जो माणूस असून अमानुष्य
जो ज्ञानी असून अज्ञानी
तोच आहे खरा दहशतवादी...
ज्यांच्या आहे पोटात आग
ज्यांच्या आहे हृदयात राग
जीवनात नसतो देशभक्तीचा भाग
तोच आहे खरा दहशतवादी...
ज्याला ना प्रेम आपुलकी
जिव्हाळा, श्रद्धा, भक्ती
दया, क्षमा, शांती बंधुभाव
तोच आहे खरा दहशतवादी...
जे घेतात निर्दोष लोकांचे बळी
दहशद हीच त्यांची खेळी
अशांची करावी जागीच होळी
तोच आहे खरा दहशतवादी...
प्रा. संतोष कदम..
व्हिडीओ साठी खलील लिंक वर जा..👌👌👌
दहशतवादी..
Post a Comment