Classes | क्लासेस..
पोरगं आज माझं एकदाच दहावी पास झालंकसंबसं पस्तीस टक्यावर जाऊन पोहचल
अकरावीच्या क्लासेस मध्ये त्याच नाव टाकलं
अभ्यास करण्यासाठी छोट घर भाड्याने घेतलं
शेतात राबराब राबून थोडा पैका गोळा केला
इकडून तिकडून काढून क्लासेस ला जमा केला
बाप महा म्हणे पोरगा लई हुशार निघाला
चांगल्या शिक्षणासाठी शहरात नेऊन घातला
बापाने महा जेवायला खानावळ लावून दिले
गावाकडून आल्यापरत थोडा पैका देत गेले
कॉलेजचे त्याने कधी तोंडच नाही पाहिले
कारण क्लासेसमुळे मुले कॉलेजला विसरले
अवाढव्य फीस भरून क्लास करून राहिले
क्लासेस वाल्यांचे धाबे हल्ली दन-दनु लागले
पण आजकालच्या लोकांना कोण बरे सांगे
कोसो दुरून नौकारीवाले शहरात येऊन गेले
शिक्षणाच्या नावाखाली नुसते बाजारीकरण झाले
क्लासेस च्या नादात मुले वाईट मार्गे लागले
क्लासेस च्या नावाखाली मस्ती करून राहिले
भर रस्त्यावर एकमेकांच्या गळ्यात पडून राहिले
बाच्या माघारी पोरगा मुलीच्या मागे फिरत राहिला
सिगारेटचे कस घेत धुवा हवेत उडू लागला
दारूच्या नशेत मस्त नंगा नाचू करू लागला
सांगा मित्रानो इथे खरचं बाप कुठे कमी पडला
लाज-लजेची सीमा कुणाकडे राहिली
बापाच्या समोर मुली वाईट कृत्य करु लागली
मित्रांच्या नादाला लागून बिगडून जाऊ लागली
नको ते सवयी लावून करियर बरबाद केली..
बापाच्या पैशावर ऐश करत राहिले
चांगल्या नशिबाला असेच मुकत गेले
जीवनातील स्वप्ने असे लटकूनच राहिले
संपूर्ण जीवन असेच निरर्थक वाया गेले..
कवी - आनंद कदम
Classes |
क्लासेस..
Post a Comment