प्रेमात माझ्या पडशील का ? | मराठी कविता | छंद खुळा |Premat Mazya Padshil Ka ?

प्रेमात माझ्या पडशील का ..


प्रेमात माझ्या पडशील का 
जीवनात माझ्या येशिल का..

प्रेमाचा जहर घेशील का
सोबत माझ्या मरशील का,
जीवनाच्या चित्रामध्ये रंग भरशील का
वेड्या प्रेमाला आकार देशील का..

प्रेमात माझ्या पडशील का
जीवनात माझ्या येशिल का..

जीवनातील कांटे तुडवशील का
फुलासारखा जगवण्यास शिकवशील का,
सुगंध बनून सुगंधित करशील का
सर्वांना मूर्च्छित करशील का..

प्रेमात माझ्या पडशील का
जीवनात माझ्या येशिल का..

झरा बनून झुळझुळ वाहशील का
नदी बनून सागराला भेटशील का,
थंड वाऱ्याची झुळूक बनशील का
तहानलेल्या जीवास पाणी देशील का..

प्रेमात माझ्या पडशील का
जीवनात माझ्या येशिल का..

जीवनात माझी राणी होशील का
हरलेल्या जीवाला हिम्मत देशिल का,
जीवन जगायला शिकवशील का
सुख-दुःखाची वाटेकरी होशील का..

प्रेमात माझ्या पडशील का
जीवनात माझ्या येशिल का..

                          कवी - आनंद कदम..


विडिओ पाहण्यासाठी खाली क्लीक करा.
           प्रेमात माझ्या पडशील का?

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post