गोड़ आठवण..
तुला पाहताक्षणी
वेडावीलो मी फार,
रूप तुझे किती सुंदर
जसा गोड झऱ्याचा पाझर..
तुझ्या नाजूक स्पर्शाला
झालो किती अधीर,
तुझ्या कोमल स्पर्शाने
शहारले सारे अंग..
सहवास तुझा घडतांना
प्रीतीला चढला रंग,
प्रेमळ तुझ्या आठवणी
डोळ्यात तरंगल्या आज..
काहीही होवोत आता
वेगळ्या नकोत वाटा,
तुझ्या भेटी अंती
होते मनाची पुर्ती..
नाजूक क्षणांच्या त्या
सर्व गोड आठवणी,
ठेवुनी साक्षी उभ्या
डोळ्यातील अश्रूंना..
- आनंद कदम
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
Post a Comment