मैत्री खरचं काय? | मराठी कविता | छंद खुळा | Maitri Kharach Kay ?

मैत्री खरच काय..


मैत्री खरच काय असते
दोन जिवामधील माया असते


मनातील एक भाव असते
सुख-दुःख ओळखण्याचा पाया असते..

मैत्रीत सगळं काही माफ असते
संकटात धावून येणाचा मार्ग असते


मैत्री हे नातं असते जिवाभावाचे
ज्यात नसते वैर कशाचे..

मैत्री मध्ये नसते वयाची अट
नसते जाती-धर्माची आण


ज्यात असते सर्व काही समान
असते आठवणींच्या शोदोरीची खान..

मैत्री मध्ये घ्यायचा जाणून मनातील सार
हाच असतो आनंदी जीवनाचा सारासार


ज्यात वाहत असतो प्रेमाचा पाझर
ज्यात नसतो विंटर किंवा समर..

मैत्री मध्ये नसते वेळेचे बंधन
ज्यामध्ये असते आपुलकीचा मान


नसते स्वतःचे स्वतःला कशाचे भान
यालाच म्हणतात भगवाणाची देणं..

मैत्रीमध्ये दुरावा नाही होत सहन
मैत्री विना जीवन वाटते स्मशान


करून पहा मैत्रीचे अमृत प्राशन
तेव्हाच मीळेल मैत्रीचे खरे स्वर्गासन..

           कवी - आनंद कदम..



व्हिडीओ पाहण्यासाठी खलील लिंक वर जा.
                मैत्री खरचं काय

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post