हरायच नाही लढायच..
अशी कोणती वेळ आली म्हणून जग सोडून जाता
या कमकुवत जीवाला उगाच हुरहूर लावून जाता..
बायको-मुलांचा विचार न करता जीव सोडून देता
जीवनातील सुंदर स्वप्नांना अर्धवट सोडून जाता..
कुणी सांगावे यांना का असे जीवनाला संपवतात
मरणाला कुशीत घेऊन समस्या कधी संपत नसतात..
मरणाला कुशीत घेऊन समस्या कधी संपत नसतात..
आपलीच माणसं आपल्याला दूर करत असतात
जीवनातील प्रत्येक प्रश्नांना उत्तरे मिळत असतात..
आत्महत्या करण्यासाठी एवढी हिम्मत कशी येते
मरणाच्या च्या त्रासाने जीवाची लाही-लाही होते..
मरणाच्या च्या त्रासाने जीवाची लाही-लाही होते..
तरी पण जीवन यात्रा संपविण्याची घाई का पडते
नशिबही त्यांना जीवनात असे उघड्यावर का सोडते..
प्रेत्येक समस्येचा तोडगा आत्महत्याच होत नाही
आपल ओझं दुसऱ्यांना दिल तर काही होत नाही ..
आपल ओझं दुसऱ्यांना दिल तर काही होत नाही ..
कुणाचं देणं थोडं लांबल तर काही बिघडत नाही
आपल्या शिवाय परिवाराला दुसरं कोणीच नाही..
शेवटी नशिबाच्या पुढे कुणाचं काहीच चालत नाही
नशिबाला घडवल्या शिवाय स्वस्थ बसायचं नाही..
नशिबाला घडवल्या शिवाय स्वस्थ बसायचं नाही..
कुठलीही समस्या असो जीवन स्वस्तात गमवायच नाही
जीवनाच्या प्रत्येक युद्धात कधीच हार मानायची नाही..
कवि - आनंद कदम
Haraych Nahi Ladhaych
Ashi konti vel ali mhanun jag sodun jata,
Ya kamkuvat jivala ugach hurhur laun jata...
Bayko mulacha vichar n karta jiv sodun deta,
Jivnatil sundar swapna na ardhavat sodun jata..
Kuni sangave yana ka ase jivanala sampavtat,
Marnala kushit gheun samshya kadhi sampat nastat..
Aaplich mans aplyala dur karat astat
Jivnatil pratek prashna na uttare milatch astat..
Atmhatya karnyasathi yevdhi himmat kashi yete
Marnachya trasane jivachi lahi lahi hote..
Tari pan jivan yatra sampvinyachi ghai ka padte,
Nashiba hi tyana jivnat ase ughdyavar ka sodte..
Pratek samsyecha todga atmhatya ch hot nahi
Aple oze dusryala dil tar kahi hot nahi...
Kunach den thod lambl tar kahi bighadat nahi
Aplya shivay parivarala dusr konich nahi...
Shevti nashibachya pudhe kunach kahich chalat nahi
Nashibala ghadvalya shivay swasth basayach nahi...
Kuthlyahi samsya aso jivan swastat gamvayach nahi
Jivnachya pratek yuddhat kadhich har manayachi nahi...
Poet - Anand Patil
Post a Comment