दोन शब्द | मराठी कविता | छंद खुळा | Two Words | latest marathi poem


दोन शब्द ...मराठी कविता




का कुणास ठाऊक?
काही मित्र असे का असतात..
दहा शब्द बोलूनही फक्त,
एकाच शब्दात उत्तर देतात..

खरचं एका शब्दात उत्तर
लिहणे हे पण एक कलाच म्हणावं..
किती ही छान शब्द असला तरी
समोरच्यान याला काय समजावं..

मनातील भाव व्यक्त करण्याचा
एका शब्दत लिहणे हा मार्ग सोपा..
पण समोरच्या वक्तीच्या मनातील
कोण सोडवलं हा विचारांचा गुंता..

हे असं असेल ते तसे असेल 
हेच विचार करता करता
अजून दहा ओळी लिहून होतात
याचंही उत्तर शेवटी फक्त दोनच शब्दात..

या दोन शब्दात जर पाहिजे ते
सगळं उत्तर मिळाल असत..
तर रामायण आणि महाभारत 
कधी लिहलं गेलेच नसतं..

मैत्री मध्ये बिनधास्त पणे
मनातलं बोलायचं असत
आपल्या मनातील सुख दुःखाला
मुक्तपणे व्यक्त करायच असत..

जीवनातील प्रत्येक दिवसाला
मागे हसत ढकलायच असत
या सोनेरी आठवणींना
जन्मभर असंच जपायचं असत..

शेवटी त्या आठवणींना आठवून
आपलं मन क्षणभर का होईना
आनंदाने भरून आणायचं असतं
शेवटच्या दिवसांना असच जगायचं असतं...
       
                कवी - आनंद पाटील

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post