लग्ना आधी मी..
मन होते माझे जणू काही गोळा मातीचा
जसा आकार दिला तसा मी घडायचा ..
रंग दिला तसा मी चमकायचा
जिकडे हवा जाईल तिकडे मी पळत सुटायचा..
जिकडे हवा जाईल तिकडे मी पळत सुटायचा..
कधी ऊन तर कधी सावलीचा प्रवास
जसा बिना ढगांचा जोरदार पाऊस..
जसा बिना ढगांचा जोरदार पाऊस..
जीथे दिसले फुल तिथेच मी
फुलपाखरासारखा वावरायचा..
फुलपाखरासारखा वावरायचा..
फिरवलं तसं मी फिरायचा
भोवऱ्या सारखं मी जीवन जगायचा..
भोवऱ्या सारखं मी जीवन जगायचा..
लग्ना नंतर मी. . .
मन माझं झालं जणू काही मातीचा घडा
आपटले तर पडेल आता तुकडा..
कितीही रंग भरला तरी ही फिकटच वाटायचा
वाऱ्याचा माझ्यावर काही फरकच नाही पडायचा..
वाऱ्याचा माझ्यावर काही फरकच नाही पडायचा..
ढग कितीही येऊन पाऊसच नाही पडायचा
कितीही फुल दिसले तरीही सुगंधच नाही यायचा..
कितीही फुल दिसले तरीही सुगंधच नाही यायचा..
भोवऱ्या सारखा भिर-भिर फिरवल्या जायचा
आपटून आपटून घायाळ होऊन जायचा..
आपटून आपटून घायाळ होऊन जायचा..
जीवन जगताना वाटेतली काटे काढायचा
जणू स्वातंत्र्यासाठीच लडत-पडत जगायचा..
जणू स्वातंत्र्यासाठीच लडत-पडत जगायचा..
Lagna aadhi mi...
Man hote maze janu kahi gola maticha
Jasa aakar dila tasa mi ghadaycha..
Rang dila tasa mi chamkaycha
Jikde hava Jael tikde mi palat sutaycha...
Kadhi un tar kadhi savlicha pravas
Jasa bina dhagancha jordar paus...
Jithe disle ful tithech mi
Fulasarkha vavrayacha...
Firval tas mi firaycha
Bhovrya sarkha mi jivan jagaycha...
Lagna nantar mi....
Man maz zal janu kahi maticha ghada
Apatle tar padel ata tukda...
Kiti hi rang bharla tari hi fikatch vataycha
Varyacha mazyavar kahi farakch nahi padaycha...
Dhag kiti hi yeun paus ch nahi padaycha
Kiti hi ful disle tari hi sugandh ch nahi yaycha...
Bhovrya sarkha bhir bhir furvlya jaycha
Aptun aptun ghayal houn jaycha ...
Jivan jagtana vatetli kate kadhaycha
Janu swatantrya sathi ch ladat ladat jagaycha...
Poet - Anand Patil
Post a Comment